निसर्गातून शिकलेले जीवनाचे धडे:तुमची वाट तुम्हालाच शोधायची आहे.
निसर्गातून शिकलेले जीवनाचे धडे:तुमची वाट तुम्हालाच शोधायची आहे.एका शांत संध्याकाळी निसर्गाने मला शिकवलं की कातळातूनही उगवणाऱ्या कोंबापासून प्रेरणा घ्या आणि स्वतःची कहाणी घडवा."
कविता
Jayashree Thitme
11/7/20241 मिनट पढ़ें
निसर्ग: जीवनाची अद्भुत कहाणी सांगणारा शिक्षक
एका शांत संध्याकाळी झोक्यावर बसून, खिडकीतून बाहेर पाहताना मनात एक उदासीनता भरून राहिली होती. विचार आला, "आज काहीच खास नाही." कॉफीचा कप घेत, बाहेर पाहताना निसर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
स्वतःचा मार्ग शोधण्याची प्रेरणा
उदासीनतेतून नवा दृष्टिकोन : समोरच्या झाडाजवळ एक नाजूक मूळ दिसलं. कठोर धरतीतून वाट काढत पाणी शोधणाऱ्या त्या मुळाने मला जीवनाचा एक सुंदर धडा शिकवला."प्रत्येकाने स्वतःची वाट स्वतः शोधायची असते," असं जणू त्या मुळाने मला सांगितलं.
तसेच कोंबाची नाजूकता पाहून, त्याचा संघर्ष जाणवल्यावर कळलं की जीवनही असंच असतं—आपल्या मार्गात कितीही अडथळे आले तरी आपल्याला वाट काढायची असते.या अनुभवातून मी शिकले की, निसर्ग सतत आपल्याला शिकवतो.आपली वाट कोणीच तयार करत नाही. कणखर राहून, स्वतःच निर्णय घेत, स्वतःची कहाणी घडवायची असते.
कविता: जीवनाचा मार्ग निसर्गातून
मनावर सावट उदासीनतेची,
बसले नभी बघत एकांती;
मनी वाट पाहत उल्हासाची,
हाती घेऊन कॉफी तजेली.
झाड म्हणालं का ग, तू गुपचूपशी?
नको वाट बघू तू इतर कोणाची.
ऐक जरा या निसर्गाची कहाणी;
पाणी नाही पोहोचे जरी मुळाशी.
नाजूक मूळ शोधी वाट कातळातूनही;
जरी सूर्यकिरणं न पोहोचे बीजापाशी.
इवलासा कोंब शोधी वाट धरणीतूनही;
थांबव तू वाट बघणं या वाटेची.
तूच आहे वाट स्वतः स्वतःची.
"तुमचं निसर्गाशी असलेलं नातं काय? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये सांगा."
"तुम्ही स्वतःच्या वाटा शोधण्यासाठी कोणते उपाय करता? आम्हाला कळवा."
"मैंने जो लिखा है, वह आपको कैसा लगा? आपके विचार, सुझाव, या अनुभव जानने की उत्सुकता है। अगर कोई कन्फ्यूजन या सवाल हैं, तो कमेंट में ज़रूर बताएं—आपकी राय मेरे लिए महत्वपूर्ण है!"
मेरे सोशल मीडिया पर भी आप जाकर देख सकते हैं:
[YouTube link ]