हळदीकुंकू – मनातील हितगुज आणि काही हलकंफुलं हास्य
हळदीकुंकू – मनातील हितगुज आणि काही हलकंफुलं हास्य. हळदीकुंकू सोहळ्यातील स्त्रियांच्या मनातील न बोललेलं हितगुज, गोड आठवणी, आणि हलकंफुलं हास्य उलगडणारा ब्लॉग.
कविता
Jayashree Thitme
1/13/2025


हळदीकुंकू – एक अनुभव प्रत्येक स्त्रीच्या मनाचा !
हळदीकुंकू संक्रांतीचा एक असा सोहळा आहे, जिथे फक्त वाण वाटण्यापुरता समारंभ नसतो, तर तो स्त्रियांच्या मनातील अदृश्य हितगुज मांडणारा प्रसंगही असतो. यावर्षी मला हळदीकुंकवाला जायला जमलं नाही. पण, दुसऱ्याच दिवशी माझ्या मनात विचारांचं वादळ आलं. ते विचार हळुवार हास्य आणि गोड आठवणी घेऊन आले आणि त्या आठवणींनी या कवितेचे रूप घेतलं.
प्रत्येक स्त्रीला हा अनुभव येतो – त्या भेटीत आपण काय घेतलं, कोणी काय दिलं, आणि कोणाच्या वाणात काय नव्हतं याची चर्चा मनातच सुरू होते. हे हितगुज जरी बोललं नसलं, तरी त्यात एक वेगळीच मजा असते.
हळदीकुंकवाच्या निमित्ताने तयार होणाऱ्या आठवणी, तिळगुळाचा गोडवा, वाणातलं कौतुक, आणि नाती-गप्पा यांचा आनंद मनाला एक वेगळाच सणसाजरा करायला लावतो. याचे क्षण केवळ परंपरेचा भाग न राहता, कायम हृदयाच्या कोपऱ्यात घर करतात.
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...
"मैंने जो लिखा है, वह आपको कैसा लगा? आपके विचार, सुझाव, या अनुभव जानने की उत्सुकता है। अगर कोई कन्फ्यूजन या सवाल हैं, तो कमेंट में ज़रूर बताएं—आपकी राय मेरे लिए महत्वपूर्ण है!"
मेरे सोशल मीडिया पर भी आप जाकर देख सकते हैं:
[YouTube link ]
कविता:
यावर्षी हळदीकुंकवाला जायला काही जमले नाही,
पण काय सांगू बाई, हळदी कुंकू मात्र मला काही विसरले नाही.
दुसऱ्या दिवशी का होईना, आठवणीने वाण आले घरी.
मैत्रिणी, शेजारणी, नंदा वहिनी, ताई सगळ्याच कशा वाट बघत राही.
कुणाचं फुल पांढरं, तर कुणाचं फुल गुलाबी,
आपलं फुल सोडून दुसरीकडेच नजर जाई.
काय सांगू बाई, या वर्षी हळदीकुंकवाला जायलाच जमले नाही.
कुणाच्या आवडीचं केळ, तर कोणाच्या आवडीचं संत्र,
वाट्याला काय येतंय, यातच लक्ष वेधलं.
काय सांगू बाई, या वर्षी हळदीकुंकवाला जायलाच जमले नाही.
कोणाच्या उपयोगाची वाटी, तर कोणाच्या उपयोगाची फणी,
प्रत्येकीचं म्हणणं एकच– "मी लुटलं तेच जास्त उपयोगी."
काय सांगू बाई, या वर्षी हळदीकुंकवाला जायलाच जमले नाही.
कोणाचा तिळगुळ फक्त तिळाचा,
तर कोणाचा तिळगुळ तीळ-खोबरे-शेंगदाण्याचा.
काय म्हणे कौतुक – "आमच्याकडे बाई लागतो याच पद्धतीचा!"
यावर्षी हळदीकुंकवाला जायलाच काही जमले नाही,
पण काय सांगू बाई, हळदी कुंकू मात्र मला काही विसरले नाही.
Recent Posts