निसर्ग दावितो जीवनाची कहाणी
निसर्ग दावितो जीवनाची कहाणी: एका उदास संध्याकाळी, एक नाजूक मूळ, नाजूक कोंब—जीवनाची कहाणी दावीत गेलं, [अंतर्मुखतेचा अनुभव] तूच आहे वाट स्वतः स्वतःची सांगून गेलं.
कविता
Jayashree Thitme
11/7/20241 min read
शांत संध्याकाळ. झोक्यावर बसून, खिडकीच्या बाहेर बघत असताना मनात एक उदासीनता भरलेली होती. “आज काही विशेष नाही,” असे विचार करत, मी एक कप गरमागरम कॉफी बनवली. कॉफीचा सुवास घेत, मनातील चिंतेला थोडा विसरण्याचा प्रयत्न करत, मी बाहेरच्या निसर्गात डोकावले.
माझ्या समोरच्या कातळात, एक हिरवगार झाड उभं होतं, जणू ते मला काही सांगण्याची वाट पाहत होतं. त्या झाडाच्या जवळ एक नाजूक मूळ मला दिसलं, ज्याला जणू धरतीच्या कणाकणांतून पाणी शोधायचं होतं. मी विचार केला, “हे मूळ किती नाजूक आहे! जरी मी त्याला बोट लावलं, तरी ते तुटून जाईल.”
एवढ्या कठोर धरतीतून इवलाचा कोंब सूर्यकिरणाला शोधत त्या धरतीतूनही वाट काढत वरती येतो, किती नाजूक असतो. तो सुद्धा स्वतःची स्वतः वाट शोधतो, कोणाची वाट नाही बघत. हे पाहून मला एक विचार आला: “प्रत्येकाने आपल्या जीवनातील वाट स्वतःच शोधायची असते.”
या क्षणांनी मला एक गोष्ट शिकवली की, आपल्याला कोणाची वाट पाहायची नसते. आपणच आपल्या जीवनाची कथा लिहिणारे असतो. जेव्हा आपल्या आयुष्यातील उतार-चढावातून मार्ग काढण्यासाठी निसर्ग आपल्याला प्रेरणा देतो, तेव्हा आपल्याला कळतं की, आपली कहाणी आपल्याच हातात आहे.
मनावर सावट उदासीनतेची,
बसले नभी बघत एकांती;
मनी वाट पाहत उल्हासाची,
हाती घेऊन कॉफी तजेली.
झाड म्हणालं का ग, तू गुपचूपशी?
नको वाट बघू तू इतर कोणाची.
ऐक जरा या निसर्गाची कहाणी;
पाणी नाही पोहोचे जरी मुळाशी.
नाजूक मूळ शोधी वाट कातळातूनही;
जरी सूर्यकिरणं न पोहोचे बीजापाशी.
इवलासा कोंब शोधी वाट धरणीतूनही;
थांबव तू वाट बघणं या वाटेची.
तूच आहे वाट स्वतः स्वतःची.
"मैंने जो लिखा है, वह आपको कैसा लगा? आपके विचार, सुझाव, या अनुभव जानने की उत्सुकता है। अगर कोई कन्फ्यूजन या सवाल हैं, तो कमेंट में ज़रूर बताएं—आपकी राय मेरे लिए महत्वपूर्ण है!"
मेरे सोशल मीडिया पर भी आप जाकर देख सकते हैं:
[YouTube link ]