गालावरची रिमझिम

कहानी तुम्हारी हमारी- गालावरची रिमझिम " – पावसाच्या हलक्या थेंबांमध्ये लाज आणि हसू मिसळले, जणू निसर्गाने माझ्या मनातली गोड भावना जागवल्या. "नकळत हसू आणि रिमझिम पाऊस गालावरती" - ह्या शब्दांतून ती अनुभूती व्यक्त झाली.

गाणं

Jayashree Thitme

1/3/20251 min read

"गालावरची रिमझिम" – एक अनोखा अनुभव, जेव्हा पावसाच्या टिप टिप आवाजाने मी एक वेगळ्याच जगात हरवले. एका संध्याकाळी, माझ्या घराच्या कौलांवर पावसाचे पडणारे पाणी, त्याचा आवाज, आणि हवा हे सगळं जणू एक वेगळी जादू निर्माण करत होते. त्याच आवाजात मला असा अनुभव झाला, जणू पाऊस माझ्याशी बोलतो आहे.

रिमझिम पावसाच्या थेंबात काहीतरी गूढ आणि लहानशा आनंदाची गोष्ट होती. माझ्या गालावर पाणी टप टप टपकत होतं आणि त्या गालावरच्या पाण्यामुळे मला नकळत हसू आलं. त्या हसण्यात काहीतरी नवीनपणा होता, जणू लहान मुलांसारखा आनंद, नव्या नवरीसारखी लाज, आणि एकदम तरुणपणाची भावना. पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत, मला असं वाटलं की जणू माझं मन हलकं झालं आहे.

पाऊस मला लाजवत होता, आणि तो लाजवताना मला पुन्हा एकदा नव्या उमेदीने आणि नवीन जीवनाची गोडी देत होता. त्या पावसात मी एकटीच होती, पण माझ्या मनातील भावना, हसू आणि लाज ह्या सर्व गोष्टी गाण्यात उतरवल्या. "गालावरची रिमझिम" हे गाणं त्या भावनांची, हसण्याची आणि जीवनाच्या नवनव्या सुरांचं प्रतीक आहे. ही कविता फक्त शब्दांत बांधलेली नाही; ती पावसाच्या पहिल्या थेंबाचा अनुभव आहे, जो प्रत्येक वयाच्या माणसाला नकळत लहान मुलासारखा आनंद देतो. जरी आपण पावसाबद्दल कितीही बोललो, की किती त्रास होतो किंवा तयारीची गरज असते, तरीही गालावर पावसाचा पहिला थेंब पडताच, नकळत हसू येतं.

ह्या अनुभवात, पावसाच्या प्रत्येक थेंबात असं एक खास आणि अप्रतिम गोडपण होतं, जे शब्दात मांडता येईलच असं नाही."रिमझिम पाऊस गालावरती, नकळत हसू आणी," हे ओळींमधून जणू तो पाऊस सांगतो की तुमचा खरा स्वभाव, तुमचा खरा आनंद, तुमचं गुपित उघड करून ते तुमचं मन हलकं करायला आला आहे. पावसाच्या त्या थेंबांमध्ये सगळ्यांच्या मनाला भिजवणारा एक गोडवा आहे, ज्याचा अनुभव प्रत्येकजण घेतो.

ही कविता म्हणजे पावसाच्या गालावरच्या थेंबांनी लावलेला आनंदाचा मोहर आहे.

गालावरची रिमझिम

रिमझिम पाऊस गालावरती,

नकळत हसू आणी,

जाई कानामंदी सांगून,

गुपित हळूहळू बाई।

लाज आणी डोळ्यामंदी,

बावरी नजर माझी,

गोड स्वप्नी रमुनी जाई,

मी अल्लड साधी भोळी।

रिमझिम पाऊस गालावरती,

नकळत हसू आणी।

"मैंने जो लिखा है, वह आपको कैसा लगा? आपके विचार, सुझाव, या अनुभव जानने की उत्सुकता है। अगर कोई कन्फ्यूजन या सवाल हैं, तो कमेंट में ज़रूर बताएं—आपकी राय मेरे लिए महत्वपूर्ण है!"

मेरे सोशल मीडिया पर भी आप जाकर देख सकते हैं:

[YouTube link ]

[Instagram link]

[Twitter link]

Get in touch

Address

Mumbai, Maharashtra, India